मोट्ठ्या इमारतींच्या भाऊ-गर्दीत एकच प्रचंड जल्लोष सुरु झाला. त्या भयंकर रांगेच्या मध्यभागी ती भेदार्लेली साध्वी.
पुढे श्वेताम्बर साधूंचा जत्था, मागे रडवेले कुटुंब. जेमतेम सहा वय असेल तिच. " काय हे पुण्यवान जमनदास!", गर्दित चर्चा सुरु झाली. "ब्राह्मणाला न विचारता घर बांधले नाही, कधी व्यसनांच्या आहारी गेले नाहीत, की कधी धंद्यात लबाडी! आता तर समाजाला मुलगी सुद्धा अर्पण! नक्कीच त्यांच्या स्थायी केवली विहार करत असावा!"
येथपर्यंत आल्यावर तिने आपले जुने व नवीन कपडे, दागिने, जरी पटका आणि इतर गोष्टी जमावात फेकायला सुरुवात केली. प्रत्येक जाणार्या वस्तूबरोबर साधूंचा जप, बायकांचा आक्रोश, जमानादासंचे समाधान आणि तिच उत्साह वाढतच होता. आता सगळ्या भौतिक सुखांचा त्याग करून ती सहा वर्षांची भावी साध्वी मोक्षप्रप्तिस्तव पुढे निघाली. थोड्याच दिवसात ती आपले धड न वाढलेले केस स्वतः च्याच हातांनी उपटून काढेल. तय वेदना तिला स्रामानांच्या जवळ आणि स्वतः पासून दूर नेतील.
"काय हे धन्य जमनादास, ह्या जन्मी का नसेना, मुलीस पुढील जन्मी नक्की पुरुष योनितून पक्का मोक्ष मिळेल." खुद्द सावकार सुद्धा ह्या पापक्षलानाच्या सौद्यात पक्केच निश्चल आणि तृप्त दिसत होते. "एकतर हुंडा वाचला, आणि त्यातून पुण्य लाभ!" आता सरकारी अधिकार्यांना लाच देताना जमानादासंचे मन त्यांना आतून खाणार नव्हते, किमान पुढची दोन वर्षे. "त्यानंतर, एक मंदिर बांधून द्यावे, की मग झाले." "केवढी उलाढाल वाढेल, परत हुंडा वाचला, त्यातून मुलगी साध्वी. सगलेच कसे छान जमून आले आहे."
मुलगी मात्र भयंकर खुश होती. गर्दी, तिच्या मध्यभागी सुवर्ण रथ, रथाच्या मध्यात ती, सगळ्यांचे लक्ष तिच्यावर, सुन्दर वस्त्रे, सुन्दर अन्न. तिचा आजचा दिवस तरी फारच मजेत चालला होता. सावकारही प्रसन्न दिसत होते. खिन्न होता तो वर्धमान, आणि कदाचित रिषभ, आणि पार्श्व.
Thursday, May 21, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
3 comments:
why why why would you not post in english!
I couldn't write this in english
Your prose sounds nice when I read it aloud in my head.
But I think i have only vaguely understood the content after struggling with it for 15 minutes (limited vocabulary being the reason).
Will read once again tonight.
Post a Comment